ration shop: रेशन दुकान आता होणार मिनी बँक
Ration shop
रेशन दुकान आता होणार मिनी बँक
बंधू-भगिनींनो आपणा सर्वांना माहितीच आहे की रेशन दुकानाचा उपयोग कशासाठी होतो. मात्र आता रेशन दुकानाचा वापर स्वस्त धान्य देण्याव्यतिरिक्त बँकेप्रमाणे आर्थिक व्यवहार करण्यासाठी देखील होणार आहे. हो हे अगदी खरं आहे आता यापुढे रेशन दुकानात ration shop मध्ये आपल्याला शासकीय तसेच खाजगी बँकांचे आर्थिक व्यवहार करता येणार आहे.अशी घोषणा अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. या व्यतिरिक्त देखील अजून काही सुविधा धान्य दुकानात मिळणार आहेत. नक्की काय आहे ही योजना व त्याचा नागरिकांना काय फायदा होऊ शकतो याची माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
![]() |
Ration Shop |
उद्देश:
बँक प्रमाणे तसेच पोस्ट बँक प्रमाणे सर्व सुविधा त्यादेखील डिजिटल पद्धतीने गावातील नागरिकांना मिळाव्यात त्यासोबतच रेशन दुकानदारांचे उत्पन्न वाढून त्यांचा आर्थिक फायदा व्हावा हा प्रमुख उद्देश या योजनेचा आहे. Ration shop
देशात परवडणारी व विश्वासार्ह बँक बनविण्याच्या दृष्टीने इंडियन पोस्ट पेमेंट बँक सुरू करण्यात आली. बिल भरणा,थेट हस्तांतरण अर्थात DBT व आरटीजीएस अशा प्रकारच्या सुविधा या पोस्ट बँक मध्ये देण्यात येतात.याच अनुषंगाने आता राज्यातील स्वस्त धान्य दुकानात देखील अशाच प्रकारच्या सेवा देण्यात येणार आहे.म्हणजेच आता रेशन दुकान मिनी बँक म्हणून देखील ओळखले जाणार आहे.
रेशन दुकानदारांची ऐच्छिक स्वरूपात बँकेचे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात येणार आहे.
बँकेच्या या सुविधा सुरू करण्यापूर्वी रेशन दुकानदारांना याबाबत प्रशिक्षण देण्यात येईल.तसेच या योजनेची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.
रेशन दुकानदारांना फायदा:
सर्वात महत्वाचे म्हणजे आता रेशन दुकानदारांना अधिकचे उत्पन्न साधन निर्माण होणार आहे. ration shop
राष्ट्रीयकृत बँका,खाजगी बँका,इंडियन पोस्ट बँक यांच्या सर्व सुविधा नागरिकांना गावात भेटल्यामुळे अनेक जण याठिकाणी येतील व रेशन दुकानदाराचे उत्पन्न वाढेल.रेशन दुकान चालकास बँक सोबत बँक प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळेल.
बँक सूविधे सह pm wani या वायफाय सर्व्हिस मध्ये देखील कमिशन मिळणार आहे.याव्यतिरिक्त आवश्यकतेनुसार आधार कार्ड मशीन देखील पुरवण्यात येणार आहे.यामधून रेशन दुकानदारांना चांगला नफा होणार आहे.
👉आता रेशन दुकानात जाण्याची आवश्यकता नाही घरपोच मिळणार रेशन.ही माहिती देखील वाचा👈
नागरिकांना काय होईल फायदा:
रेशन दुकानात मिनी बँक सुरू झाल्यास नागरिकांना गावामध्ये च बँकेच्या सुविधा मिळणार आहे.राज्यात अनेक दुर्गम भाग आहेत याठिकाणी नागरीकांना बँकेशी संबधित काही व्यवहार करायचे असल्यास शहराच्या किव्वा जवळील मोठ्या गावात जावे लागते त्यामुळे वेळ व पैसा दोन्ही जातात.अशा ठिकाणी ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे. Ration
त्यासोबतच शासनाच्या विविध सेवा असतात या सेवा या बँक प्रतिनिधी द्वारे गावातील नागरिकांपर्यंत सहज पोचवणे शक्य होईल.
बँकसुविधा व्यतिरिक्त रेशन दुकानापासून 200 मीटर पर्यंतच्या अंतरापर्यंत PM WANI या फ्री वायफाय सुविधेचा देखील लाभ घेता येणार आहे.'ration shop'
बँक सुविधेसोबतच भविष्यात आधार सर्व्हिस सुरू करण्यासाठी आधार कार्ड मशीन देखील देण्यात येणार आहे यामुळे देखील नागरिकांना फायदा होऊ शकतो. ''Ration shop''
सदर बँक सुविधा देणेसाठी तेथील भौगोलिक परिस्थिती व त्या ठिकाणची आवश्यकता पाहून देणेत येणार आहे.
आजची रेशन दुकान संबंधी माहिती आपणास आवडली असेल तर ती इतरांसोबत देखील शेअर करा.
👉आणखी इतर योजना विषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये अवश्य सामील व्हा.👈
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
सदर साईट शासनाची अधिकृत वेबसाईट नाही,तरी कोणत्याही अचूक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी