Electricity rights of consumers rules 2020: वीज पुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना मिळते नुकसान भरपाई
Electricity rights of consumers rules 2020:
Electricity rights of consumers rules
Electricity rights of consumers rules 2020: वीज पुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना मिळते नुकसान भरपाई
बंधू-भगिनींनो नमस्कार सध्या कडक उन्हाळा सुरू आहे तापमानाने उच्च पातळी गाठलेली आहे. त्यामुळे उन्हात घराच्या बाहेर पडणे देखील अवघड होत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात विजेचे आवश्यकता अधिक प्रमाणात वाढते मात्र सध्या वीज जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे सर्व सामान्यांना त्याचा त्रास होत आहे. मात्र वीज गेल्यानंतर त्याची नुकसान भरपाई देणे हे संबंधित वीज वितरण कंपनीला बंधनकारक आहे हे बरेच जणांना माहीत देखील नसेल. आज आपण याच विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
![]() |
Electricity rights of consumers rules 2020 |
आपण लाईट गेल्यानंतर आपल्या शेजारच्या घरातली लाईट गेली आहे का पाहतो व ती गेली असेल तर धन्यता मानून शांत बसतो मात्र विशिष्ट कालावधी पेक्षा अधिक काळ लाईट खंडित झाली असेल तर ग्राहक वीज वितरण कंपनीकडे नुकसान भरपाई मागू शकतो. वीज कायदा 2003 नुसार नियम 2014 मध्ये नुकसान भरपाई मागण्याची तरतूद केलेली आहे.
वीज कंपनीने ग्राहकांना खराब सेवा दिली असेल किंवा वेळेमध्ये कोणतेही काम केले नसेल तर नुकसान भरपाई घेणे हा ग्राहकांचा हक्क आहे व त्यासाठी संबंधित कंपनी त्यासाठी बांधील आहे.
मात्र काही दुरुस्तीच्या कामानिमित्त वीज खंडित होणार असले बाबतची पूर्वसूचना दिलेली असेल तर मात्र वीज ग्राहकाला नुकसान भरपाई मागता येणार नाही.
मात्र कसलीही सूचना न देता वीज पुरवठा कट केला अथवा खंडित केला तर नुकसान भरपाई कंपनीला द्यावी लागते. Electricity rights of consumers rules
वीज पुरवठा खंडित होण्याची प्रमुख कारणे:
1) ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड झाल्याने.
2) फ्युज गेल्याने.
3) ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे.
या कारणांमुळे तसेच पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे.
पुढील परस्थितिमध्ये ग्राहकांना नुकसान भरपाई मागता येते:
1) समजा शहरी भागामध्ये फ्युज गेल्यामुळे वीज खंडित झाली असेल व ती 4 तासांच्या आत मध्ये पुन्हा सुरू झाली नाही तर, नुकसान भरपाई देणे वीज कंपनीवर कायदेशीर बंधन आहे जर खंडित झालेला पुरवठा चार तासांपेक्षा अधिक काळ सुरू झाला नाही तर प्रत्येक ग्राहकास प्रत्येक तासासाठी 50 रुपये इतके नुकसान भरपाई द्यावी लागू शकते. "Electricity rights of consumers rules"
2) ग्रामीण भागात देखील असाच काहीसा नियम आहे मात्र ग्रामीण भागात फ्युजमुळे लाईट गेली असेल तर ती जास्तीत जास्त 24 तासांच्या आत मध्ये सुरळीत केली गेली पाहिजे असे वीज कंपनीवर बंधन आहे. जर 24 तासांपेक्षा अधिक कालावधी लाईट सुरु होण्यास लागत असेल तर प्रत्येक ग्राहक प्रत्येक तासासाठी 50 रुपये इतकी भरपाई मागू शकतो.
3) जर शहरी भागामध्ये ओव्हर हेड वायर किंवा आत्ता बऱ्याच ठिकाणी भूमिगत वायर आहेत त्या जर तुटल्यामुळे लाईट गेली असेल तर जास्तीत जास्त 6 तासांच्या आत मध्ये वीजपुरवठा सुरळीत केला गेला पाहिजे असे वीज वितरण कंपनीवर बंधन आहे. जर 6 तासांपेक्षा अधिक काळ वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर प्रत्येक ग्राहकास प्रत्येक तासासाठी 50 रुपये इतकी नुकसान भरपाई कंपनीला द्यावी लागते.
4) जर ग्रामीण भागात ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असेल तर जास्तीत जास्त 24 तासांच्या आत मध्ये वीजपुरवठा सुरळीत झाला पाहिजे असे कंपनीवर बंधन आहे जर 24 तासांच्या आत मध्ये वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर प्रत्येक वीज वितरण ग्राहकास प्रत्येक तासासाठी 50 रुपये इतकी भरपाई द्यावी लागते. consumers rules
5) शहरी भागामध्ये ट्रान्सफॉर्मर मध्ये काही बिघाड झाला असेल त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असेल तर 24 तासांच्या आत मध्ये वीज पुरवठा सुरळीत झाला पाहिजे असे वीज वितरण कंपनीवर बंधन आहे जर 24 तासांपेक्षा अधिक कालावधी लागला तर प्रत्येक तासासाठी प्रत्येक ग्राहक 50 रुपये भरपाई मागू शकतो.
6) जर ग्रामीण भागात ट्रान्सफॉर्म मध्ये बिघाड झाल्यामुळे वीस पुरवठा खंडित झाला असेल तर जास्तीत जास्त 48 तासांच्या आत मध्ये वीज पुरवठा सुरळीत झाला पाहिजे असे वीज वितरण कंपनीवर बंधन आहे. मात्र तरीही या कालावधी पेक्षा अधिक कालावधी वीज पुरवठा सुरू होण्यास लागला तर संबंधित वीज वितरण कंपनीला प्रत्येक ग्राहकासाठी प्रत्येक तासासाठी 50 रुपये इतकी नुकसान भरपाई द्यावी लागते.
नुकसान भरपाई कशी मिळू शकते:
वरील कोणत्याही परिस्थितीमध्ये जर एखाद्या ग्राहकास वीज वितरण कंपनीकडून नुकसान भरपाई घ्यावयाची असेल तर ती कशी घेता येईल याबद्दल माहिती पाहूया.
आपण ग्रामीण किव्वा शहरी भागातील ग्राहक असाल तरीही आपल्या भागामध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता किती तास वीज पुरवठा खंडित होता याची माहिती घ्या. यामधून त्रुटी चा कालावधी सोडून ठरवलेल्या मुदतीपेक्षा किती तास अधिक वीज पुरवठा खंडित झाला होता हे पाहून प्रत्येक तासासाठी 50 रुपये नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपल्या विभागातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये ग्राहक कक्षाकडे एक अर्ज करा. जर अर्ज करून पंधरा दिवसांमध्ये नुकसान भरपाई नाही दिली किव्वा आपली तक्रार ऐकून घेतली नाही तर ग्राहकांनी संबंधित वीज वितरण कंपनीच्या तक्रार निवारण मंचाकडे पुढील तक्रार करावी.या तक्रार मंचाने 60 दिवसाच्या आतमध्ये नुकसान भरपाई देण्याचे आदेश संबधित कंपनीला देणे बंधनकारक असणार आहे.मात्र आत्ता देखील तक्रार मंचाने आपला अर्ज फेटाळला असेल तर पुढील अर्ज विद्युत लोकपाल यांच्याकडे करता येईल.याचे कार्यालय मुंबई येथे आहे.येथे तक्रार करण्यासाठी mercombudsman.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन देखील करता येते किंवा या कार्यालयामध्ये जाऊन देखील करता येऊ शकते तसेच पोस्ट च्या माध्यमातून देखील करता येऊ शकते.
नुकसान भरपाई खरच मिळू शकते का:
ग्राहकांच्या अधिकारांबाबत अनेक कायदे अस्तित्वात आहेत मात्र हे सामान्य नागरिकास बहुदा माहित नसते किंवा माहीत जरी असले तरी कोणीही तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नाही कारण बऱ्याच जणांचा असा समज असतो की नुकसान भरपाई ही मिळू शकत नाही. मात्र कोणत्याही गोष्टीचा पाठपुरावा केल्यास ती गोष्ट नक्कीच मिळू शकते, किंबहुना मिळालेली आहे याची अनेक उदाहरणे आहेत. 2019 साली पुण्यातील एका वीज ग्राहकास 24 हजार रुपये इतके नुकसान भरपाई मिळालेली आहे. वर्ध्यातील एका ग्राहकास तर 9 लाख 12 हजार रुपये इतकी नुकसान भरपाई वीज वितरण कंपनीकडून मिळालेली आहे. तशी माहिती देखील विद्युत लोकपाल च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
त्यामुळे आपल्याकडे देखील वीजपुरवठा खंडित झाला असेल तर विद्युत नियमक आयोगाच्या 2014 नुसार आपण देखील वीज वितरण कंपनीकडे नुकसान भरपाई मागू शकतो.
आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तसेच वरील follow या पर्यायावर क्लिक करून पोर्टल ला अवश्य फॉलो करा.धन्यवाद.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
सदर साईट शासनाची अधिकृत वेबसाईट नाही,तरी कोणत्याही अचूक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी