labour card: या कार्डद्वारे कामगारांना मिळतात असंख्य लाभ


labour card: या कार्डद्वारे कामगारांना मिळतात असंख्य लाभ 

 

भारताची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जशी लोकसंख्या वाढत आहेत तसतशी लोकांच्या गरजा वाढत आहेत यामुळेच संघटित किंवा असंघटित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता   देखील वाढत आहेत. शासनामार्फत विविध घटकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. कामगारांना न्याय मिळवून देणे,त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी केंद्र सरकारने 1996 मध्ये labour card ही योजना सुरू केली.कामगारांना आर्थिक सहाय्य मिळून त्यांना योजनेचा अधिक फायदा व्हावा या दृष्टीने लेबर कार्ड योजना राबवली जाते याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.


labour card
Labour Card 


केंद्र सरकार अंतर्गत कामगारांच्या कल्याणासाठी श्रम आणि रोजगार मंत्रालय स्थापन केले आहे. याद्वारे कामगारांच्या रोजगार तसेच कल्याणवर भर दिला जातो. देशात असंख्य लोक हे कमी उत्पन्न असणारे आहेत यातील बहुतेक लोक हे रोजंदारी वर काम करणारे,शेती किंवा बांधकाम व्यवसायिक अशा प्रकारच्या मेहनतीच्या कामाद्वारे आपला उदरनिर्वाह करत असतात.

केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या लेबर कार्ड हे राज्य सरकार जारी करते याचा उपयोग संबंधित कामगार तसेच त्यांच्या कुटुंबांना होतो.

राज्य सरकारच्या कामगार विभागाने जारी केलेले हे कार्ड आहे. याचा उपयोग संबंधित लाभार्थ्याला या योजनेच्या विविध सेवा सुविधांचा लाभ घेण्यासाठी होतो. थोडक्यात सांगायचे तर या ओळखपत्राद्वारे कामगारांच्या शिक्षणाची, सुरक्षितेची व कल्याणाची जबाबदारी घेतली जाते.

 


कार्ड हे दोन प्रकारांमध्ये आहे-

1) बिल्डिंग लेबर कार्ड- जे कामगार परवानाधारक कंत्राटदाराच्या अंतर्गत काम करतात असे कामगार बिल्डिंग लेबर कार्ड साठी पात्र असतात.

2) सोशल लेबर कार्ड- जे कामगार शेती क्षेत्राशी संबंधित आहेत असे कामगार सोशल कार्ड साठी पात्र असतात यामध्ये त्यांना आरोग्य विम्याचा लाभ देखील मिळतो.



लेबर कार्ड चे उद्दिष्ट:

लेबर कार्ड धारकास एक युनिक नंबर दिला जातो. यामुळे राज्य किंवा केंद्र सरकार द्वारे दिल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांचा थेट लाभ लेबर कार्ड धारकांना मिळतो. यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य मिळणे सहज शक्य होते. labour card या कार्ड अंतर्गत वीटभट्टी कामगार,फिटर,वायरमन,गवंडी,सुतारकाम,रंगकाम,खोदकाम कर्मचारी,लोहार,सेंटरिंग काम करणारे कर्मचारी,वेल्डर,दगड फोडणारे मजूर,गटरकाम करणारे कामगार,नळजोडणी करणारे,बंधाऱ्याचे काम करणारे,चुनाभट्टी मध्ये काम करणारे,मदतनीस इत्यादी मेहनतीचे काम करणाऱ्या मजुरांना कामगार कार्ड दिले जाते.



लेबर कार्ड चे फायदे:

1) कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते.

2) गृह कर्ज मिळते.

3) संबंधित क्षेत्रातील उपकरणे खरेदीसाठी आर्थिक मदत मिळते.

4) कामगाराच्या मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत दिली जाते.

5) कौशल्य विकास मदत मिळते.

6) कार्डधारकाच्या मुलांना मोफत शिक्षण मिळते.

7) जीवन विम्याचा लाभ मिळतो. labour card

8) अपघाता मध्ये दुखापत किव्वा मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य दिले जाते.

9) महिलांना बाळंतपणासाठी आर्थिक मदत दिली जाते.

10) घरकुल मिळण्यास पात्र.

 



निकष:

1) वय 18 ते 40 दरम्यान असावे.

2) अर्ज करणारा व्यक्ती भारताचा नागरिक असावा.

3) अर्ज करणारा व्यक्ती असंघटित कामगार असावा.

4) मासिक उत्पन्न 15 हजारापेक्षा जास्त नसावे.

5) अर्जकर्ते EPF/ESIC किव्वा NPS चे सदस्य नसावे.

6) सदर व्यक्ती आयकर भरणारी नसावी.'labour card'

7) ज्या राज्यात अर्ज केला आहे त्या राज्यातील ती व्यक्ती असावी.

[8) संबधित कामगाराने प्रत्येक वर्षी कमीत कमी  90 दिवस काम केले पाहिजे


 

      👉 फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👈



आवश्यक कागदपत्रे:

1) आधार कार्ड.

2) बँक खाते नंबर.

3) ई- मेल आयडी.

4) कुटुंबातील इतर सदस्यांचे आधार कार्ड.

5) मोबाईल नंबर. "labour card"

6) पासपोर्ट साईज फोटो.

 



अर्ज प्रक्रिया: labour card apply online

सर्वात प्रथम राज्य कामगार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी. मुख्य पृष्ठावर 'new labour card registration' दिसेल यामधे तुमचा जिल्हा,आधार कार्ड नंबर,मोबाईल क्रमांक,मेल आयडी भरून OTP घेऊन submit करावे.

अर्जामध्ये सर्व कागदपत्रे अपलोड करावीत ज्यामध्ये आधार कार्ड,रेशन कार्ड,मतदान कार्ड व बँक पासबुक इत्यादी  

अर्ज submit झाल्यानंतर पुन्हा त्याच वेबसाइटवर "click here to know labour registration status" या पर्यायावर क्लिक करावे व आधार नंबर किव्वा अर्ज नंबर  टाकून अर्जाची स्थिती तपासू शकता. संबंधित अधिकाऱ्यांनी कार्ड ला मंजुरी दिल्यास कार्ड तयार झाले असेल तर labour card download करून घावे.

 



टिप्पण्या