divyang yojana maharashtra : महाशरद पोर्टल योजना संपूर्ण माहिती

 divyang yojana maharashtra : महाशरद पोर्टल योजना संपूर्ण माहिती 

maha sharad portal

 divyang yojana maharashtra : महाशरद पोर्टल योजना संपूर्ण माहिती 

divyang yojana maharashtra
divyang yojana maharashtra


महाराष्ट्र राज्यातील अंध, अपंग, वृद्ध व्यक्ती, मानसिक रुग्ण, अनाथ मुले तसेच निराधार विधवा महिला अशा प्रकारच्या नागरिकांसाठी त्यांचे जीवनमान सुधारावे त्यांच्या आयुष्यात उत्पन्नाचा मार्ग निर्माण करून त्यांचे जीवनमान स्थिर रहावे यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार काही योजना राबवत असते.divyang yojana maharashtra

राज्यामध्ये अनेक दिव्यांग व्यक्ती आढळून येतात मात्र त्या सर्वांना शासनाच्या कोणत्याही योजनेची माहिती मिळत नाही त्यामुळे सदर लाभार्थ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळवता येत नाही.

दिव्यांग व्यक्तींना शासनामार्फत काही योजना राबविल्या जातात अशाच प्रकारे शासनाची एक योजना म्हणजे महा शरद योजना,

ज्या दिव्यांग बांधवांना त्यांच्या आवश्यकतेनुसार वस्तूंची आवश्यकता असते मात्र त्यांना ती वस्तू घेणे शक्य होत नाही त्यासाठी महा शरद पोर्टल सुरू करण्यात आले या पोर्टलमार्फत त्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे मदत मिळू शकते.

महाराष्ट्र शासनाद्वारे महा शरद पोर्टल ही  एक महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे यामार्फत राज्यातील दिव्यांग व्यक्ती त्यांच्या नावाची नोंद या पोर्टलवर करू शकतात तसेच राज्यातील काही दानशूर व देणगीदार व्यक्ती देखील या पोर्टलवर नोंदणी करू शकतात व ते या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या अपंगत्वानुसार त्यांना लागणाऱ्या वस्तूंसाठी मदत करू शकतात.divyang yojana maharashtra

दिव्यांग नागरिकांना त्यांचे जीवन सुलभ व्हावे व त्यांना त्यांच्या अपंगत्वानुसार आवश्यक ते उपकरणे व साधने मिळावे जेणेकरून त्यांना इतरांप्रमाणे सर्वसामान्य आयुष्य जगता यावे हा मुख्य हेतू महा शरद पोर्टल चा आहे.

महा शरद पोर्टल या योजनेची सुरुवात 2020 पासून करण्यात आली. हे पोर्टल महाराष्ट्र सरकार द्वारे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे सुरू करण्यात आले आहे या योजनेचे मुख्य लाभार्थी हे महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग नागरिक असणारा आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग नागरिकांना महा शरद पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे."divyang yojana maharashtra"

महा शरद पोर्टल या द्वारे गरजू दिव्यांग नागरिकांना मदत मिळवून देणे व समाजातील सामाजिक कार्यकर्ते दानशूर व्यक्ती सेवाभावी संस्था किंवा इतर व्यवसायिक यांच्यामार्फत मदत मिळून देण्यासाठी हे पोर्टल महत्वाचा दुवा मानला जात आहे.

महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही प्रकारची दिव्यांग व्यक्ती या पोर्टलवर नोंदणी करू शकते यामुळे अनेक प्रकारच्या सुविधा त्यांना मिळणार आहे ही नोंदणी अगदी विनामूल्य असणार आहे तसेच दानशूर व्यक्ती दिव्यांग नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना मदत करू शकतात. दिव्यांग व्यक्तींनी या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर दानशूर व्यक्तींमार्फत त्यांना आवश्यक ते साहित्य तसेच इतर लागणारी उपकरणे व कृत्रिम अवयव मोफत पणे मिळणार आहे.

divyang yojana

आवश्यक कागदपत्रे व निकष:

महा शरद पोर्टलवर दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी पुढील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहे.

या पोर्टलवर फक्त दिव्यांग नागरिक तसेच देणगीदार व्यक्तीच नोंदणी करू शकतात तसेच नोंदणीकर्ता हा महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपी रहिवासी असावा.

1) आधार कार्ड

2) मोबाईल क्रमांक

3) रहिवासी प्रमाणपत्र

4) पासपोर्ट साईज फोटो

5) दिव्यांग प्रमाणपत्र

yojana maharashtra

नोंदणी कशी करावी:

महा शरद पोर्टल मध्ये दिव्यांग नागरिक तसेच देणगीदार हे नोंदणी करू शकतात व दिव्यांग नागरिकांची माहिती घेऊन देणगीदार त्यांना आवश्यकतेनुसार मदत करू शकतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे.

नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम महायोजना या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. सुरुवातीला आपणास होम पेज ओपन होईल व नोंदणी मध्ये दोन प्रकारच्या नोंदणीसाठी पर्याय दिसतील एक म्हणजे दिव्यांग व दुसरा देणगीदार सुरुवातीला आपण दिव्यांगांसाठी नोंदणी कशी करावी याबाबत माहिती पाहुयात-

*नोंदणी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर सुरुवातीला दिव्यांग व्यक्तीचे नाव जन्मतारीख तालुका गावचे नाव आधार क्रमांक मोबाईल नंबर इत्यादी माहिती भरावी.

*सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकल्यानंतर एक पासवर्ड तयार करावा लागेल.

*पुढे त्या व्यक्तीचे अपंगत्वाचे स्वरूप व ते अपंगत्व किती टक्के आहे याची माहिती भरावी लागेल व नंतर 150 KB मध्ये दिव्यांग प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल.

*सर्व माहिती भरून झाल्यानंतर रजिस्टर वर क्लिक करावे आता सर्व माहिती भरून पूर्ण होईल.

महाराष्ट्र राज्यातील ज्या दानशूर व्यक्तींना किंवा सेवाभावी संस्था यांना दिव्यांग व्यक्तींना मदत करायची आहे त्यांनी देखील या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. देणगीदार व्यक्तींना नोंदणी करण्यासाठी प्रथम पोर्टलवर जावे लागेल यानंतर होम पेज ओपन होईल या होम पेजवर देणगीदार हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करावे यामध्ये रजिस्टर यावर क्लिक करावे व सर्व माहिती भरावी जसे की देणगीदाराचे नाव जन्मतारीख राज्य जिल्हा तालुका गाव लिंग आधार क्रमांक मोबाईल नंबर इत्यादी सर्व माहिती भरल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून एक पासवर्ड तयार करावा.

सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारची व कोणत्या प्रकारच्या दिव्यांगास देणगी द्यायची आहे तो पर्याय निवडावा त्यासाठी select intrest for donation to divyang type यावर क्लिक करावे त्यानंतर अपंगत्वाचे प्रकार समोर दिसतील त्या पर्यायामधून तुम्हाला ज्या अपंगत्वासाठी मदत करायची आहे तो पर्याय निवडावा.

पुढे तुम्हाला देणगी भरावी लागेल व रजिस्टर बटनावर क्लिक केल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल.


अधिक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्या.

अशाच प्रकारच्या आणखी माहितीसाठी आमच्या संकेतस्थळास अवश्य भेट द्या.



टिप्पण्या