pm kisan : पीएम किसान सम्मान योजनेचा १४ वा हप्ता लवकरच होणार जमा,मात्र त्याआधी कराव्या लागणार या बाबींची पूर्तता.

 pm kisan :

pmkisan

pm kisan samman

pm kisan yojana

pm kisan : पीएम किसान सम्मान योजनेचा १४ वा हप्ता लवकरच होणार जमा,मात्र त्याआधी कराव्या लागणार या बाबींची पूर्तता.


शेतकरी बंधू-भगिनींनो नमस्कार, आपल्याला माहितीच असेल की पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. मात्र हा हप्ता जमा होण्यापूर्वी कृषी आयुक्तालयाकडून शेतकऱ्यांना काही बाबी तपासून पाहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.
जर या बाबी लाभार्थी शेतकऱ्यांनी पूर्ण केलेल्या नसतील तर पुढील येणारा पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार नाही त्यामुळे नक्की कोणत्या बाबी कृषी आयुक्तालयाकडून सांगण्यात आलेल्या आहेत याबाबत आपण आज माहिती पाहणार आहोत.

pm kisan
pm kisan


कृषी आयुक्तालयाकडून सांगण्यात आलेल्या बाबी:


कृषी आयुक्तालयाकडून प्रामुख्याने तीन बाबी शेतकऱ्यांनी तपासून पाहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे यामध्ये ती बाब कोणत्या आहे. त्याबाबत कार्यवाही काय करावी लागेल तसेच त्यासाठी जबाबदारी कोणाची असणार आहे या गोष्टी देखील सांगितल्या आहेत.pm kisan 

1) pm kisan EKYC इ-केवायसी करणे: 

शेतकरी बांधवांना पुढील हप्ता मिळवण्यासाठी आपले केवायसी करणे बंधनकारक असणार आहे. ही केवायसी केल्याशिवाय येणारा चौदावा हप्ता जमा होणार नाही अशा सूचना आहेत. इ केवायसी करण्यासाठी शेतकरी बांधवांना पीएम किसान च्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन स्वतः देखील OTP बेस द्वारे केवायसी करू शकतात. त्याचप्रमाणे जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत मधील आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत देखील केवायसी करू शकता किंवा केंद्र शासनाच्या फेस डिटेक्शनच्या ॲपद्वारे देखील इ केवायसी करता येईल. या सर्व प्रक्रियेचे जबाबदारी ही संबंधित लाभार्थी म्हणजेच शेतकऱ्याची असणार आहे.

2) land seeding No :

राज्याच्या भूमी अभिलेख नोंदणी प्रमाणे अध्यायात करणे यासाठी आवश्यक त्या संपूर्ण कागद पत्रांच्या सह संबंधित तहसील कार्यालयाची संपर्क करावा. या प्रक्रियेचे जबाबदारी संबंधित तहसीलदार यांची असणार आहे.


3) aadhar seeding with bank account:

 लाभार्थी शेतकऱ्यांचे ज्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होतो, अशा बँक खात्यामध्ये आधार सीडिंग करणे आवश्यक आहे. बँकेमध्ये आधार केवायसी केल्याशिवाय येणारे पुढील हप्ते जमा होणार नाहीत. बँक केवायसी करण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने बँकेमध्ये जाऊन केवायसी चा फॉर्म भरून सोबत आधार कार्ड जोडून बँकेमध्ये जमा करावे. याशिवाय लाभार्थी शेतकऱ्यांनी इंडियन पोस्ट मध्ये आपले खाते उघडू शकतात  जेणेकरून या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे हप्ते जमा होतील. या सर्व बाबींच्या पूर्ततेची जबाबदारी संबंधित शेतकऱ्याची असणार आहे. pm kisan

वरती दिल्याप्रमाणे तीन बाबी पूर्ण असायला हव्यात तरच येणारा हप्ता तसेच त्यापुढील हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील जर या बाबी अपूर्ण असतील तर हप्ता जमा होणार नाहीत त्यासाठी शेतकऱ्यांनी या बाबींची पूर्तता करणे गरजेचे आहे. "pm kisan"

पूर्तता झाल्याचे खात्री कशी करावी:

वरील प्रमाणे सर्व बाबींची पूर्तता झाली आहे का याची खात्री शेतकऱ्यांनी केली पाहिजे त्यासाठी लाभार्थ्यांनी पीएम किसान च्या पोर्टलवर जाऊन beneficiary status या पर्यायावर क्लिक करून enter registration no. मध्ये registration no. टाकून तसेच समोरील code टाकून get data वर क्लिक करावे.यानंतर आपली सर्व माहिती समोर दिसेल.  यात आपली सर्व माहिती बरोबर  आहे का हे पाहावे. kisan
Registration no. नक्की कोणता हे जाऊन घेण्यासाठी know your registration no. या पर्यायावर क्लिक करावे व आपला मोबाइल नंबर किंवा आधार क्रमांक टाकून आपला registration नंबर प्राप्त करता येतो.



टिप्पण्या