mahadbt : शेतकरी बांधवांना कुट्टी मशीन खरेदीसाठी मिळणार 100% अनुदान
Mahadbt:
mahadbt शेतकरी बांधवांना कुट्टी मशीन खरेदीसाठी मिळणार 100% अनुदान:
![]() |
Mahadbt |
शेतकरी बांधवांनो आपण जर शेतीचा व्यवसाय त्याचबरोबर जोडधंदा म्हणून आपण दुग्ध व्यवसाय करत असाल तर आपल्याकडे कुट्टी मशीन असणे आवश्यक आहे.
आपण दुग्ध व्यवसायासाठी गायी पाळत असाल तर त्या संपूर्ण चारा खात नाहीत त्यामुळे त्यांना दिला जाणारा चारा हा वाया जातो त्यामुळे त्यांना पूरक आहार मिळत नाही तसेच चााऱ्याचे नुकसान देखील होते व त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो.
महाराष्ट्र शासनाच्या mahadbt योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी कुट्टी मशीन साठी अनुदान दिले जात आहे त्यासाठी निकष व पात्रता काय असते कोण अर्ज करू शकतो, कागदपत्रे काय लागतील, अर्ज कसा करावा लागेल याबाबत संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत.mahadbt
काय आहे योजना:
Mahadbt योजनेअंतर्गत कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला mahadabt च्या पोर्टल वर अर्ज करावा लागतो.अर्जाची निवड ही लॉटरी पद्धतीने केली जाते यामध्ये जर पहिल्या वर्षी जर आपला नंबर लागला नाही तर तोच अर्ज पुढील वर्षी ग्राह्य धरला जातो व आपला नंबर पुढील वर्षी लागू शकतो.mahadbt
अनुदान किती मिळेल:
कुट्टी मशीन या दोन प्रकरच्या आपल्याला घेता येतील 1) मनुष्यचालित 2) स्वयंचलीत.
जर आपण मनुष्य चलीत कुट्टी मशीन साठी अर्ज केला तर त्यासाठी 5000 रुपये अनुदान मिळेल.या मशिनद्वारे आपल्याला हाताने फिरवून कुट्टी करावी लागेल.
स्वयंचलीत कुट्टी मशीन साठी जर आपण अर्ज केला तर त्यासाठी 16,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. हि मशीन इलेक्ट्रिक मोटर च्या साहाय्याने चालते.
म्हणजेच 100% अनुदान हे कुट्टी मशीन साठी दिले जाते. DBT
आवश्यक कागदपत्रे:
1) 7/12
2) 8अ
3) आधार कार्ड
4) बँक पासबुक
5) आधार लिंक मोबाईल नंबर
अटी:
1) लाभार्थी हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
2) सदर लाभार्थ्यांचे कोणत्याही बँकेत आधार कार्डाची जोडलेले बँक खाते असावे.
3) 10 एकर पेक्षा कमी शेती असावी. "mahadbt"
शेतकरी योजनेच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.
लाभ कसा घ्यावा:
Mahadbt योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी आपण जवळच्या महा ई सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत मधील आपले सरकार सेवा केंद्रा मध्ये जाऊन online अर्ज करू शकता.
या व्यतिरिक्त तुम्ही स्वतः देखील आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर मध्ये mahadbt या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करू शकता.
स्वतः अर्ज सादर करण्यासाठी स्वर्वप्रथम mahadbt या संकेतस्थळावर जाऊन नवीन युजर आयडी तयार करून घ्यावा व लॉगिन करून आपला सात बारा, 8अ,बँक माहिती तसेच सिंचनाखालील क्षेत्र टाकावे.
यानंतर कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय निवडावा लागेल व बाबी निवडा मध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडावा.
समोर सर्व तपशील दिसेल यामध्ये ट्रॅक्टर चलित अवजारे हा पर्याय निवडावा.
अवजारे या मध्ये फोर एज ग्रुप कटर सिलेक्ट करावे.
मशीन चा प्रकार यामध्ये चाप कटर 5 एचपी मोटर चलित किव्वा ट्रॅक्टर चलित हा पर्याय निवडावा.
सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यावर अर्ज सादर करावा व ऑनलाईन 23.30 रुपये कट होतील. व एक पावती जनरेट होईल ती जपून ठेवावी.
यानंतर ज्यावेळेस आपले नाव या योजने मध्ये येईल म्हणजेच लॉटरी पद्धतीने आपले नाव सिलेक्ट होईल त्यावेळेस आपल्याला मोबाईल वर तसा मेसेज येईल त्यानंतर आपण कुट्टी मशीन खरेदी करू शकता व खरेदी केलेली GST बिलाची पावती आँनलाईन अपलोड करावी. यानंतर आपल्याला योजनेचे अनुदान आपल्या बँक खात्यावर जमा होईल.
शेतीविषयी योजनेच्या अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळास अवश्य भेट दया.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
सदर साईट शासनाची अधिकृत वेबसाईट नाही,तरी कोणत्याही अचूक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी