consumer rights: बँक ग्राहकांचे हे अधिकार सर्वांना माहीत असायला हवे
consumer rights:
consumer rights: बँक ग्राहकांचे हे अधिकार सर्वांना माहीत असायला हवे
आर्थिक बाबतीत कोणताही व्यवहार करण्यासाठी आपला बँकेशी संपर्क हा येतच असतो मात्र अनेक जणांना काहीं ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी वाईट अनुभव हा येत असतो.
ग्राहकांना आपले अधिकार माहीत नसल्यामुळे अनेक बँकेमध्ये ग्राहकांची फसवणूक होऊ शकते त्यांची कामे वेळेवर होत नाहीत त्यांना बँकेच्या अनेक चकरा माराव्या लागतात त्यामुळे वेळ तर जातोच व त्यासोबत मानसिक त्रास देखील होतो.
त्यामुळे ग्राहकांचे कोणकोणते अधिकार आहेत.RBI चे नियम काय आहेत हे आपल्याला माहीत असेन आवश्यक आहे.जेणेकरून भविष्यात आपल्याला अडचण येणार नाही.
तर नेमके ग्राहकांचे काय काय अधिकार आहेत हे आपण सविस्तर पाहुयात.
बँक ग्राहकांचे हे अधिकार सर्वांना माहीत असायला हवे:
![]() |
consumer rights |
1) कोणत्याही बँकेची प्रमुख जबाबदारी ही ग्राहकांची खाजगी माहिती गुप्त ठेवणे ही असते.तसेच काही कारणाने ती कोणासोबत शेअर करावयाची असल्यास त्यास ग्राहकाची संमती असणे आवश्यक आहे.
2) ग्राहकाला कर्ज द्यायचे की नाही हा सर्वस्वी निर्णय बँकेचा असतो मात्र कर्ज नाकारले तर ते का नाकारले याचे लेखी कारण ग्राहकाला देणे बंधनकारक असते. consumer rights
3) जर समजा कोणाकडे एखादी कोणतीही फाटलेली नोट असेल तर ती तुम्ही कोणत्याही बँकेतून बदलून घेऊ शकता.बँक त्यासाठी कोणाला नकार देऊ शकत नाही.
4) कोणत्याही व्यक्तीचा कायमस्वरूपी पत्ता
नसल्याने त्यास बँक खाते उघडण्यापासून अडवू शकत नाही देशात कोठेही राहणाऱ्या
व्यक्तीचे बँक खाते कोणत्याही बँकेत उघडता
येते. consumer rights
5) NEFT मार्फत व्यवहार करताना कोणीही कोणत्याही बँक शाखेतून 50,000 पर्यंत ची रक्कम दुसऱ्या बँक शाखेत किव्वा बँकेत वर्ग करू शकतो.जरी त्या व्यक्तीचे संबधित बँकेत खाते नसेल तरीही.
6) चेक कलेक्शन मध्ये जास्त वेळ लागल्यास संबंधीत ग्राहकाला बकेकडून भरपाई द्यावी लागते. rights
7) एखाद्या ग्राहकाने कोणत्याही बँकेतून कर्ज घेतले असेल व त्या कर्जासाठी काही तारण दिले असेल तर कर्ज प्रकरण पूर्ण झाल्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये ते तारण परत करावे लागते.
8) कोणत्याही आर्थिक प्रकरणा मध्ये बँक व ग्राहक यांच्यामधे काही करार झाला असेल परंतु त्यामध्ये बँकेला काही बदल करावयचा असल्यास त्याअगोदर 30 दिवस नोटीस द्वारे माहिती देणे बंधनकारक आहे.
9) जर कोणत्या ग्राहकाच्या बँक खात्यामधून अनधिकृतपणे व्यवहार झाले असतील तर त्यास ग्राहकाला जबाबदार धरता येत नाही. "consumer rights"
10) बँकेच्या व्यतिरिक्त कोणतेही इतर उत्पादने तसेच सुविधा घेण्यास बँक जबरदस्ती करू शकत नाही.
बँकेशी संबंधित हि माहिती असणे आवश्यक आहे वाचा सविस्तर
11) बऱ्याच वेळेला आपण ATM मध्ये पैसे काढण्यासाठी जातो मात्र काही कारणाने व्यवहार पूर्ण होत नाहीं व पैसे येत नाही मात्र काही वेळात मोबाईल वर पैसे काढल्याचा मेसेज येतो.अशा परिस्थितीमध्ये बँकेकडून पैसे रिफंड केले
जातात. याची ऑनलाईन तक्रार देखील करता
येते.मात्र RBI च्या नियमानुसार जर तक्रार केल्यानंतर 7
दिवसाच्या
आत पैसे रिफंड झाले नाही तर बँक प्रति दिवस शंभर रुपये याप्रमाणे आपल्याला दंड
देईल.
वरीलपैकी कोणत्याही प्रकरणामध्ये एक ग्राहक या
नात्याने बँक आपला अधिकार नाकारत असेल तसेच कोणतेही कारण नसताना बँक लोन नाकारत
असेल तसेच कोणत्याही आर्थिक व्यवहार करताना जास्त वसुली करत असेल ज्यादा चार्ज
लावत असेल अशा कोणत्याही प्रकरणासाठी ग्राहक बँकिंग लोकपाल यांच्याकडे एक लेखी
तक्रार दाखल करता येऊ शकते.
बँकिंग लोकपाल चा पत्ता प्रत्येक बँकेमध्ये
दर्शनी भागात लावलेला असावा व तो असायलाच पाहिजे.किंवा तो RBI च्या संकेत स्थळावर देखील उपलब्ध असतो.
कोणत्याही बाबतीत तक्रार करायची असल्यास
सुरवातीला संबधित बँकेच्या बँक शाखा अधिकारी यांच्याकडे करावी जर तेथे आपले समाधान
झाले नाही तर बँक विभागीय कार्यालयामध्ये करावी.समजा तेथेही समाधान झाले नाही तर
मग बँकिंग लोकपाल कडे तक्रार करावी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
सदर साईट शासनाची अधिकृत वेबसाईट नाही,तरी कोणत्याही अचूक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी