digital curancy: digital curancy अर्थात e - rupees म्हणजे काय? याचे फायदे कि नुकसान?

 digital curancy:

 digital curancy अर्थात e - rupees म्हणजे काय? याचे फायदे कि नुकसान?

पूर्वी आरबीआय नोटा छापून त्या बँकेमार्फत सर्वसामान्य नागरिकांना मिळत असे. डिजिटल करन्सी मध्ये अशाच  नोटा राहतील या नोटांना सिरीयल नंबर तसेच गव्हर्नर ची सही देखील यावर असेल मात्र या नोटा फिजिकल नसतील म्हणजेच आपल्याला हातामध्ये या नोटा मिळू शकत नाही तर या नोटा डिजिटल स्वरूपात असतील.


digital curancy
digital curancy


ज्या प्रमाणे आपल्याकडे फिजिकल नोटा असतात त्याचप्रमाणे E RUPEE हे एक डिजिटल नोटा आहेत या मार्फत आपण जसा एखादा व्यवहार करताना समोरच्या व्यक्तीस 100,200,500,2000 च्या नोटा देतो त्याचप्रमाणे यामध्ये देखील एक प्रकारच्या नोटाच आहे मात्र या नोटा डिजिटल स्वरूपात आपल्याला पहावयास मिळतील.

E RUPI व UPI यामध्ये नेमका फरक काय?

आपणा सर्वांना एक प्रश्न नक्कीच पडू शकतो की E RUPI व UPI यामध्ये नेमका फरक काय आहे तर मुख्य फरक तर हा राहील की ज्यावेळेस आपण यूपीआय च्या माध्यमातून व्यवहार करतो त्यावेळेस पैसे हे बँक टू बँक ट्रान्सफर होत असतात म्हणजे एका बँकेमधून दुसऱ्या बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतात मात्र ते पैसे आपल्याकडे स्वतःकडे येत नसतात म्हणजेच बाय हॅन्ड हा व्यवहार होत नसतो म्हणजेच हा पैसा संबंधित बँकेमध्ये असतो.

मात्र E RUPI मध्ये बँकेची आवश्यकता नसते तसेच या पद्धतीमध्ये बँकेचा अधिकार अजिबात राहत नाही बँक आपले पैसे हे RBI कडे राहणार आहेत. आपल्या परवानगीशिवाय इतर कोणी या पैशाचा वापर करू शकत नाही.

समजा थोडक्यात सांगायचे झाले तर एखादी बँक काही कारणाने बंद पडली तरी आपल्याला आपले पैसे सुरक्षित ठेवता येऊ शकतात.

 आपले पैसे हे आरबीआय कडे जमा असतात त्यामुळे आपले पैसे हे पूर्णपणे सुरक्षित राहणार आहे हा एक मोठा फायदा या माध्यमाचा आहे.


डिजिटल करन्सीचा नेमका काय काय फायदा आहेत हे आपण पाहूयात:

1) डिजिटल करन्सी फिजिकल स्वरूपात नसते त्यामुळे त्याला सांभाळण्याचा,चोरी होण्याची किंवा नोटा खराब होण्याची भीती नाही.

2) सरकारला फिजिकली पैसे साठवण्यासाठी खूप खर्च करावा लागतो एका जागेवरून दुसऱ्या जागी नेण्यासाठी किंवा चोरी होऊ नये यासाठी त्याची खूप सुरक्षा ठेवावी लागते तसे डिजिटल करन्सी मध्ये याची आवश्यकता नाही.

3) व्यवहारांसाठी अतिरिक्त शुल्क लागणार नाही आपण पाहतो की आपण एटीएम मधून ज्यावेळेस तीन-चार वेळेस व्यवहार करतो त्यावेळेस बँक प्रत्येक व्यवहारासाठी अतिरिक्त शुल्क लावते मात्र डिजिटल करन्सी मध्ये हे शुल्क लागणार नाही.


डिजिटल करन्सी चे नुकसान:

आपण डिजिटल करन्सी चे जे जे फायदे आहे ते पाहिले मात्र याचे काही नुकसान देखील आहे ते आपण सविस्तर पाहूयात.digital curancy

1) ज्यावेळेस आपल्याकडे फिजिकल नोटा उपलब्ध असतात त्यावेळेस त्यावर कोणाचाही कंट्रोल नसतो म्हणजेच कोणत्याही यंत्रणेला आपल्याकडे कॅश किती आहे याची माहिती मिळत नाही मात्र डिजिटल करन्सी मध्ये सर्व व्यवहाराबाबत पारदर्शकता राहणार आहे.आपल्या प्रत्येक व्यवहारावर यंत्रणेची  नजर राहणार आहे.

2) ज्यावेळेस आपण बँकेमध्ये पैसे ठेवतो त्यावेळेस आपल्याला त्याचे व्याज मिळत असते मात्र डिजिटल करन्सी मध्ये व्याज हे बिलकुल मिळणार नाही. कारण या पैशावर आरबीआयचा कंट्रोल राहणार असतो यामध्ये कोणतीही इतर बँक नसते. "digital curancy"

3) डिजिटल करन्सी मुळे कर्ज घेण्यास अडचणी येऊ शकतात कारण आपण बँकेकडून ज्यावेळेस कर्ज घेतो त्यावेळेस बँक आपला सिबिल स्कोर पाहत असते त्यानुसार आपल्याला कर्ज द्यायचे की नाही याचा विचार करते मात्र DIGITAL CURUNCY मध्ये आपले सर्व व्यवहारा ची माहिती आपल्या स्वताकडे असणार  आहे.यात बँकेचा संबंध कोठेही राहणार नाही.

                       एकूणच जर विचार केला तर digital curancy हे एक व्यवहाराची नवीन पद्धत आहे कोणतेही नवीन तंत्रज्ञान येते तेव्हा त्याबद्दल समाज गैरसमज हे असतातच मात्र या गोष्टीला भविष्यात किती प्रतिसाद मिळतो हे पहावे लागणार आहे.

टिप्पण्या