CBIL स्कोअर म्हणजे काय व तो कसा वाढवायचा?
CBIL
जेव्हा पण आपल्याला एखादी नवीन मालमत्ता खरेदी करायची असते तेव्हा खरेदीची रक्कम मोठी असल्यास आपल्याला लोन घ्यावे लागते परंतु आपण जेव्हा एखाद्या बँकेत किंवा वित्त संस्थेत लोन साठी जातो तेव्हा ते आपले आर्थिक व्यवहार पाहतात ते म्हणजे आपल्या CBIL Score किंवा credit score या मार्फत आता सिबिल स्कोर म्हणजे काय आपल्याला पहावे लागेल.
![]() |
CBIL स्कोअर म्हणजे काय व तो कसा पहावा
Credit information bureau India limited म्हणजेच सिबिल ही एक आपल्या आर्थिक व्यवहारांची संपूर्ण रेकॉर्ड ठेवणारी कंपनी आहे बँकेमार्फत आपला संपूर्ण आर्थिक बाबींचा डाटा म्हणजेच आपण कोणत्या बँकेतून कशी व किती लोन घेतले होते त्याचे हप्ते वेळोवेळी भरलेत का याची माहिती CBIL कडे जाते त्यानंतर आपल्याला लोन द्यायचे की नाही द्यायचे हे ठरवले जाते त्यामुळे आपला सिबिल स्कोर चांगला ठेवणे गरजेचे असते.
सिबिल स्कोर हा 300 ते 900 यामध्ये असतो यात 350 ते 549 हा सिबिल अत्यंत खराब मानला जातो नंतर 550 ते 649 हा शिबिर मध्यम मानला जातो व 650 ते 749 हा सिबिल चांगला मानला जातो व 750 ते 900 हा सिबिल अत्यंत चांगला मानला जातो त्यामुळे आपला सिबिल वरीलपैकी कोणत्या प्रकारांमध्ये आहे हे महत्त्वाचे असते कार्यावरूनच आपल्याला लोन द्यायचे की नाही हे ठरवले जाते त्यासाठी आपला सिबिल हा नेहमी चांगला कसा राहील यासाठी प्रयत्न करावे लागतात तर सिविल हा कसा चांगला राहील यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहेत.
* जेव्हा पण आपण क्रेडिट कार्डचा वापर करतो तेव्हा आपल्याला त्या क्रेडिट कार्डवर एक लिमिट अमाऊंट दिलेली असते ती लिमिट अमाउंट आपण संपूर्ण कधीही वापरायची नसते ती कमीत कमी कशी वापरली जाईल याची काळजी घेणे गरजेचे असते जर समजा आपला इन्कम जास्त असेल तर आपण त्या क्रेडिट कार्ड वरील लिमिट वाढवून घेऊ शकतो.
* जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी लोन घेतो त्यावेळेस त्याचे एम आय वेळच्या वेळी भरा ते थकले जाणार नाही याची काळजी घ्या व संपूर्ण एम आय दिलेल्या कालावधी भरून टाका.
* जेवढे कर्ज फेडले जाऊ शकते तेवढेच कर्ज घ्या कारण एखादे कर्ज फेडता नाही आले तर त्याचा आपल्या सिव्हिलवर परिणाम होऊ शकतो.
* आपला EMI हा आपल्या इन्कम च्या तीस ते पस्तीस टक्के इतका असला पाहिजे कारण जर एम साठी जास्त पैसे गेले तर आपले आर्थिक गणित बिघडू शकते.
आपला CBIL SCORE कसा चेक करावा?
CBIL किती आहे हे पाहण्यासाठी आपल्याला www.cbil.com/freecbilscore या वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती जसे की आपले नाव, मेल आयडी, पॅन नंबर इत्यादी माहिती भरल्यानंतर आपल्याला आपला CBIL किती आहे हे पाहता येते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
सदर साईट शासनाची अधिकृत वेबसाईट नाही,तरी कोणत्याही अचूक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी