shravan bal yojana: या योजनेची सविस्तर माहिती पहा


 shravan bal yojana श्रावण बाळ योजना 2023 महाराष्ट्र माहिती 

बंधू भगिनींनो नमस्कार,आपला भारत देश विकसनशील देश आहे.देशात अनेक प्रमाणात आर्थिक दुर्बल तसेच वंचित,निराधार व्यक्ती ग्रामीण त्याचप्रमाणे शहरी भागात राहतात,ज्यांचे आर्थिक उत्पन्न अल्प प्रमाणात आहेत.त्यांना मजुरी करून आपले जीवन जगावे लागते.त्यामुळे त्यांच्याकडे मूलभूत गरजा भागविण्यासाठी देखील पैसे नसतात. गरीब घरातील वृद्धांना त्यांचे जीवन जगताना अनेक अडचणी येतात त्यांची उपेक्षा होते मूलभूत सुविधा देखील त्यांना काही ठिकाणी मिळणे अशक्य होते. अशा ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या प्रकारचे जीवनमान जगता यावे, त्यांना आर्थिक सहाय्य मिळावे व समाजात मानाचे जीवन जगता यावे या हेतूने शासनामार्फत shravan bal yojana राबवली जाते. या लेखांमध्ये आपण श्रावण बाळ योजना नेमकी काय आहे, या योजनेची पात्रता काय आहे तसेच या योजनेमुळे नेमका काय फायदा वृद्धांना होऊ शकतो ,या योजनेसाठी कोणते कागदपत्र लागतात व अर्ज कसा करावा लागतो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

shravan bal yojana
shravan bal yojana


 काय आहे योजना :

महाराष्ट्रातील ज्या ज्येष्ठ व्यक्तींचे वय 65 व 65 वर्षाच्या वरील आहे अशा नागरिकांना आर्थिक सहाय्य मिळून त्यांचे जीवनमान सुधारावे, त्यांना आर्थिक सहाय्य मिळवून जगण्यास पाठबळ मिळावे या उद्देशाने श्रावण बाळ योजनेच्या अंतर्गत दरमहा 600 रुपये निवृत्तीवेतन म्हणून देण्यात येते.

अशा ज्येष्ठ नागरिकांचे ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करून त्यांना या योजनेचा लाभ देता येतो.

 श्रावण बाळ योजना ही मुख्यतः श्रेणी अ श्रेणी ब या प्रकारामध्ये आहे.

अ श्रेणी :

या श्रेणीमध्ये ज्यां ज्येष्ठ नागरिकांचे वय 65 किंवा त्यावर आहे व त्यांचे नाव दारिद्र्यरेषेखाली आहे अशा निराधार स्त्री व पुरुषांना श्रावण बाळ योजनेअंतर्गत 400 रुपये प्रति महिना निवृत्ती वेतन तसेच केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन या अंतर्गत 200 रुपये देण्यात येते असे एकूण 600 रुपये प्रति महिना या अंतर्गत दिला जातो. shravan bal yojana

 ब श्रेणी:

या योजनेअंतर्गत ज्या जेष्ठ नागरिकांचे वय 65 वरील आहे व या योजनेस पात्र आहे मात्र या व्यक्तींचे नाव दारिद्र्यरेषेखालील यादीत नाही तसेच या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21 हजार रुपयांच्या आत आहे अशा नागरिकांना देखील या योजनेअंतर्गत लाभ भेटतो.


पात्रता:

शासनाने श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांबाबत दारिद्र्यरेषेखालील यादीत नाव आहे किंवा नाही यावरून दोन गट तयार केले आहे.

अ गट: 

1) संबंधित लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.

2) संबंधित पात्र लाभार्थ्याचे वय हे 65 किंवा 65 वर्षाच्या वर असावे.

3) त्याचे नाव दारिद्र्यरेषेखालील यादीत असावे.


ब गट: shravan bal yojana

1) सदर लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.

2) पात्र लाभार्थ्याचे वय 65 वर्ष व त्यापेक्षा अधिक असावे.

3) ज्या जेष्ठ नागरिकास या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे अशा व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21000 पेक्षा जास्त नसावे.

4) ब गटातील व्यक्तीचे दारिद्र्यरेषेखालील यादीत नाव नसले तरी चालते.



 आवश्यक कागदपत्रे:

1) वयाचा पुरावा - ग्रामपंचायत/ नगरपालिका यांचेकडील जन्म दाखला,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान यादी किव्वा रेशन कार्ड वरील वयाबाबत माहिती किव्वा शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्याचा वयाचा दाखला इत्यादी.


2) दारिद्र रेषेखालील असल्याबाबत दाखला.

'shravan bal yojana'

3) रहिवासी दाखला - ग्रामसेवक, तलाठी, नायब  तहसीलदार किंवा तहसीलदार यांचा रहिवासी दाखला.



ऑनलाईन अर्ज प्रक्रिया: Online Application

श्रावण बाळ योजना 2023 या योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी असतील त्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन किव्वा जवळील आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन सर्व माहिती भरावी.


*स्वतः आँनलाईन फॉर्म भरण्यासाठी सुरवातीला शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे.

* होमपेज वर new registration या पर्यायावर क्लिक करावे.

* समोर दोन पर्याय येतील जर पहिला पर्याय निवडला तर मोबाईल क्रमांक नोंदणी साठी वापरून व जिल्हा निवडून तुमचा युजर आयडी व पासवर्ड मिळेल.

पर्याय दुसरा निवडल्यास समोर एक फॉर्म येईल यामध्ये पत्ता,मोबाईल नंबर,फोटो, पत्त्याचा पुरावा,ओळखीचा पुरावा हे भरून युजर नेम व्हेरिफकेशन करावे लागेल.

* पुढे Register वर क्लिक केल्यानंतर युजर रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

* रजिस्ट्रेशन प्रक्रिया झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया करण्यासाठी युजर नेम आणि पासवर्ड व कॅपचा टाकून लॉगिन करावे.

* पुढे भरलेली सर्व माहिती दिसेल ही माहिती बरोबर असलेलची खात्री करावी.

* डाव्या साइडला सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग निवडून समोर संजय निराधार/ श्रावण बाळ योजना हा पर्याय निवडून प्रोसेस वर क्लिक करावे.

* नंतर एक अर्ज दिसेल यात नाव,मोबाईल नंबर,मेल आयडी, पत्ता इत्यादी माहिती भरावी.

* यानंतर बँकेचे नाव,शाखा नाव,आय. एफ.एस.सी कोड ही माहिती भरावी. "shravan bal yojana"

*यानंतर भरलेले सर्व माहिती समोर दिसेल याची पडताळणी करावी व सबमिट करावे.येथे आपणास एक अर्ज क्रमांक येईल हा क्रमांक जवळ ठेवावा.

अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जाची स्थिती पाहण्यासाठी याच संकेतस्थळावर भेट द्यावी व होम पेजच्या उजव्या बाजूस track your application वर क्लिक करून ड्रॉप डाऊन यामधील विभाग व योजनेचे नाव निवडून तुमचा आयडी टाकून Go याठिकाणी क्लिक करावे पुढे अर्जाची स्थिती पहावी.


ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अर्जदाराने तलाठी कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालय किवा तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा.

अशाच प्रकारच्या आणखी नवनवीन माहितीसाठी आमच्या whatsapp group मध्ये सामील व्हा.

टिप्पण्या