documents: शैक्षणिक कामासाठी आवश्यक हे दाखले लवकर काढा
documents
शैक्षणिक कामासाठी आवश्यक हे दाखले लवकर काढा
मित्र-मैत्रिणींना नुकतेच दहावी बारावीचे निकाल लागले आहेत आता आपल्याला पुढील शिक्षणासाठी ऍडमिशन घेण्याचे वेध लागले असेल. कोणत्या कॉलेजमध्ये तसेच कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा याबाबत विचार सुरू असेल. त्यामुळे अनेकांचा गोंधळ सुरू असेल.आपल्याला कोठे प्रवेश घायचा हे निश्चित तर होतं मात्र ॲडमिशन घेण्यासाठी आवश्यक असणारे documents कागदपत्रे आपल्याजवळ उपलब्ध नसतात. त्यामुळे यावेळी गोंधळ निर्माण होतो त्यामुळे आपल्याकडे महसूल विभागाचे सर्व दाखले असणे आवश्यक आहे. त्याबाबत आपण माहिती पाहणार आहोत.
![]() |
documents |
महसूल विभागातील शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचे असणारे अनेक दाखले व प्रमाणपत्र दरवर्षी महाविद्यालयांच्या ऍडमिशनच्या वेळी विद्यार्थ्यांना आवश्यक असतात. मात्र एन प्रवेशाच्या वेळी ही बाब सर्वांच्या लक्षात येते त्यामुळे सेतू केंद्रे, आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र तसेच इतर ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळते. दाखले ऑनलाईन निघत असल्यामुळे अनेक अडचणी येतात जसे की, ज्या पोर्टल मधून दाखले काढले जातात ते महाऑनलाईनचे पोर्टल याचे सर्वर डाऊन झाले, इंटरनेटचा प्रॉब्लेम येणे, सर्वरवर जास्त लोड आल्यामुळे साईट स्लो होते. परिणामी दिवस दिवसभर महा-ई-सेवा केंद्राच्या चकरा माराव्या लागतात. अशा कारणांमुळे वेळेवर दाखले मिळत नाहीत व अनेक विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजच्या प्रवेशांमध्ये अडचणी निर्माण होतात त्यामुळे शाळा कॉलेज साठी लागणारे सर्व महसूल विभागाचे दाखले वेळीच काढणे गरजेचे आहे.
documents
शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचे दाखले:
1) रहिवासी दाखला.
2) उत्पन्न दाखला.
3) वय अधिवास अर्थात डोमासाईल दाखला.
4) जात पडताळणी प्रमाणपत्र.
5) नॉन क्रिमिलियर दाखला.
6) जात प्रमाणपत्र.
7) आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाचे प्रमाणपत्र अर्थात ईव्हीएस.
दाखले मिळण्याची ठिकाणे:
1) तहसील कार्यालय मधील सेतू केंद्रे.
2) गावातील आपले सरकार सेवा केंद्रे,महा ई सेवा केंद्रे.
3) ग्रामपंचायत मधील आपले सरकार सेवा केंद्रे.documents
दाखले मिळण्याचा कालावधी:
1) 10 दिवसात मिळणारे दाखले:
उत्पन्न दाखला रहिवासी दाखला शेतकरी असल्याबाबत दाखला वय दाखला आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग प्रमाणपत्र व अल्पभूधारक दाखला इत्यादी दाखले अर्ज केल्यापासून दहा दिवसाच्या आत मिळणे आवश्यक आहे.
2) 45 दिवसात मिळणारे दाखले:
नॉन क्रिमिलियर दाखला व जात प्रमाणपत्र हे दोन दाखले अर्ज केल्यापासून 45 दिवसांच्या आत मध्ये मिळतात त्यामुळे हे दाखले लवकरात लवकर काढून घेणे आवश्यक असते.
दाखल्यांसाठी मुदत:
वर दिलेल्या सर्व दाखल्यांचे मुदत आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून म्हणजेच एक एप्रिल ते 31 मार्च असे असते. समजा एक एप्रिल च्या नंतर कधीही दाखले काढले असतील तर त्याची मुदत त्याच वर्षाच्या 31 मार्च पर्यंत असते.
शाळा कॉलेज सुरू होण्यापूर्वी अगोदर दोन ते अडीच महिने एवढा वेळ विद्यार्थ्यांना दाखले काढण्यासाठी मिळत असतो त्यामुळे हे दाखले लगेच काढण्यात यावे."documents"
वैद्यकीय कामासाठी लागणारे दाखले हेच प्रामुख्याने प्राधान्याने लवकर मिळतात इतर सर्व दाखले हे ठरवून दिलेल्या कालावधी प्रमाणेच मिळतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच दाखले काढण्याच्या तयारीला लागले पाहिजे.
याचप्रमाणे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे दाखले काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे.आपल्याला जे दाखले प्रमाणपत्र काढायची आहेत त्यासाठी इतर कागदपत्र आवश्यक असतात ते कोणकोणते असतात ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
मित्रांनो शैक्षणिक कामासाठी आवश्यक हे दाखले विषयी हि माहिती जर आपल्याला आवडली असेल तर इतरांना देखील शेअर करा.
तसेच आणखी नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
सदर साईट शासनाची अधिकृत वेबसाईट नाही,तरी कोणत्याही अचूक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी